रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची मासिक समिती बैठक पारशिवनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात संपन्न झाली. मा. नामदार श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या सहमतीने नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या या बैठकीत पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना नियमानुसार मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. राजू के. भोस्कर, समिती सदस्य श्री. प्रेमजी भांडेकर, श्री. मनोहरजी पाठक, सौ. माधुरीजी बावनकुळे, श्री. रोशनजी पिंपरुळे, श्री. आशिषजी ढोटे, श्री. अनिलजी वांढे, श्री. गजानन गोहुरले तसेच नायब तहसीलदार श्री. कुभरे आणि संजय गांधी निराधार विभागीय अधिकारी श्री. प्रितमजी शेंडे उपस्थित होते. बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ६६ आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्राप्त ७३ अशा एकूण १३९ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना नियमानुसार मंजुरी प्रदान करण्यात आली.
DBT प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांनी संपर्क साधावा
दिवाळीनंतर पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाची रक्कम DBT (Direct Benefit Transfer) द्वारे आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी पारशिवनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागाशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजू के. भोस्कर यांनी केले आहे.
DBT प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात भेट द्यावी, असेही त्यांनी सांगितले. “शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा संकल्प!” असे मत अध्यक्ष राजू के. भोस्कर यांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८४५९०३५३१५


