सरस्वती विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागात रांगोळी स्पर्धा उत्साहात

बालशिक्षण, सर्जनशीलता आणि बालपणातील आनंदाचे रंग रांगोळ्यांतून साकार

नागपूर,अनघा पेंडके(प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय येथे शिक्षक प्रशिक्षणार्थींसाठी ‘बाल्यावस्था’ (Early Childhood) या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बालपणातील आनंद, खेळातून शिक्षण, सर्वांगीण विकास, निसर्ग, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशक शिक्षण अशा विविध संकल्पना आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून साकारल्या.

प्रत्येक रांगोळीत बालमनाचे संगोपन, जडणघडण, प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि आनंददायी शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच बालशिक्षणाविषयीची समज अधिक दृढ झाली. सर्जनशीलता, सांघिक भावना आणि अध्ययन यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला. या स्पर्धेत कांचन चौधरी यांनी प्रथम, भावना गौर यांनी द्वितीय, तर प्रेरणा मुप्पीडवार यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेचे परीक्षण सौ. वैशाली जगताप आणि सौ. अनघा पेंडके यांनी केले. त्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींच्या कलात्मकतेचे, कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. श्री. टी. के. वेंकटेश यांनी शिक्षकवृंद आणि प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक करत त्यांच्या सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन दिले. बालपणातील निरागसता, आनंद आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविणारी ही स्पर्धा सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

वसुबारसेला कोतुळमध्ये सामूहिक सवत्स गोमाता पूजन

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जागृत व नवसाला पावणारे प्रसिद्ध ‘श्री वरदविनायक देवस्थान’ नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार अनादी काळापासून गोमाता…

सेवानिवृत्त उपअभियंता शंकरराव तथा एस.एम. कुलकर्णी यांचे निधन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : सार्वजनिक बांधकाम विभागातून उपअभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले शंकरराव तथा एस.एम. कुलकर्णी यांचे मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. एस.एम.…