KDMCचा मोठा निर्णय; पाणीटंचाईच्या धोक्यामुळे 20 टक्के पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

कल्याण-डोंबिवली : पावसाळा सुरू असला तरी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना टाळण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसून आगामी काळात पावसाचा वेग कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) यंदा एल निनो आणि आयओडी (Indian Ocean Dipole) यांच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा आणि अनियमित राहू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंतचा पाणीसाठा पुरेसा राहावा, यासाठी KDMC प्रशासनाने पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले असून, दैनंदिन वापरात आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची विनंती केली आहे. आगामी काही आठवड्यांत पावसाची परिस्थिती आणि धरणांमधील पाणीसाठा याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत किंवा प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…