बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

इतवारा गुन्हे शोध पथकाची कारवाई; माळ टेकडी ब्रिजखाली सापळा रचून घेतले ताब्यात

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत इतवारा गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दिनांक 07 ऑगस्ट 2026 रोजी संगम कार बाजार शॉपसमोर, बाफना परिसर येथे मंगल शंकर गवळे (वय 32 वर्षे, रा. लोंडेसांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) याचा तीन अनोळखी इसमांनी डोक्यात दगड घालून निघृण खून केला होता. या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा रजि. क्र. 270/2026, कलम 1033, 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, इतर दोन आरोपी फरार होते. त्यापैकी राजू रतन जोंधळे याच्याबाबत इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोउपनि/जळबाजी गायकवाड व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी माळ टेकडी ब्रिजखालील चहाच्या दुकानासमोर सापळा रचला. आरोपी राजू जोंधळे तेथे येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत जेरबंद केले. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे २६-२७ सप्टेंबरला आयोजन

पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या…