आदिवासी बांधवांसोबत संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी; गडचिरोलीतील २८०० नागरिकांना साहित्याचे वाटप

आनंदवन, हेमलकसा आणि अतिदुर्गम भागांत माणुसकीचा दिवा; डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक

पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : सणांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंसोबत वाटण्यातच खरा आनंद असतो, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून जपत संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने यंदाची दिवाळी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्यात आली. भामरागड, अहेरी, आलापल्ली आणि जिमलगट्टा या अतिदुर्गम भागांसह आनंदवन आणि लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून जवळपास २८०० आदिवासी बांधवांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी, अंध, अपंग, निराधार, कुष्ठरोगी तसेच गरजू नागरिकांसाठी कपडे, फराळ, मिठाई, औषधे, आकाशकंदील आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठानने फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथून मोठ्या प्रमाणात साहित्य जमा झाले.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्कार प्रतिष्ठानची टीम बाबा आमटे यांच्या वरोरा येथील आनंदवनात पोहोचली. तेथे कडू सर यांची भेट घेऊन अंध, अपंग, मूकबधिर, निराधार, कुष्ठरोगी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी साड्या, साखर, तेल, आकाशकंदील, उटणे आणि डाळ आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कुष्ठरोगी महिला व पुरुषांना कार्यकर्त्यांनी स्वतः जवळ जाऊन कपडे आणि साड्यांचे वाटप केले. यावेळी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

३ नोव्हेंबर २०२६ रोजी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयासाठी आवश्यक औषधे देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि महिलांना साड्या, साखर, आकाशकंदील, उटणे, साबण आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या हस्ते पार पडला.

४ नोव्हेंबर २०२६ रोजी जिमलगट्टा येथील आदिवासी पाड्यांवर तसेच विविध गावांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पुजारी, विलास सैद, पांडुरंग सुतार, चारुशीला ननावरे, मनीषा गांधी, मेघा चावरे, सुनीता बडे, स्मिता कदम, किरण चिवटे, तृप्ती पळसे, पल्लवी कोंडेकर, सत्यनारायण शिंदे, उल्हास तापकीर, धनश्री चव्हाण, प्रभाकर मेरूकर, संगीता मुरेकर, राजू निकरड, महेश स्वामी, प्रकाश चव्हाण, ऋतुजा तावसे, गणेश जाधव, अरुण कळंबे आणि नामदेव फलफले यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी साहित्य वाटपात सहभाग घेतला.

जिमलगट्टा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरातही २८०० आदिवासी बांधवांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश कुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक विशाल गडकर, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, प्रभाकर मेरूपर, नामदेव फलफले आणि आनंद पुजारी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल गडचिरोली पोलिसांच्या वतीने संस्कार प्रतिष्ठान तसेच मदत करणाऱ्या संस्था आणि सदस्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या उपक्रमासाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक केले. गरजवंतांसाठी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

गडचिरोलीला साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनाचे पूजन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. अण्णा कोठारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

वाटप केलेल्या साहित्याचा तपशील

साखर – २३०० किलो

रवा – ३०० किलो

तेल – २५० लिटर

डाळ – ५० किलो

साबण – ५०० नग

उटणे – ५०० नग

बिस्किट पुडे – १००० नग

मैदा – ५०० किलो

तांदूळ – १२० किलो

सुवासिक तेल – २१० नग

आकाशकंदील – ४८० नग

भांडी धुण्याचे साबण – २८८ नग

साड्या – २५०० नग

पँट-शर्ट – १४५५ नग

महिलांचे ड्रेस – १०४५ नग

लहान मुलांचे नवीन ड्रेस – ६२५ नग

लहान मुलींचे जुने ड्रेस – ८२५ नग

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या स्वामी, सुनीता गायकवाड, शुभदा फुलंबरकर, मनीषा आगम, विजय आगम, स्वाती म्हेत्रे, प्रभाकर मेरुकर, सुप्रिया गायकवाड, मीनाक्षी मेरुकर, कल्पना तळेकर, कविता वाल्हे, धनश्री चव्हाण, अनघा दिवाकर, अंजू सोनवणे, पांडुरंग सुतार यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

पिंपरी-चिंचवड मनपा सेवानिवृत्त शिक्षक संघटना आणि मोहन पटाधारी यांनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच एमआयटी कॉलेज, आळंदी; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार व प्राथमिक विद्यालय, आकुर्डी; प्राथमिक विद्यालय, वाघोली; संत तुकाराम विद्यालय, लोहगाव आणि एटीएस कॉलेज, चिंचवड यांनी साहित्य संकलनासाठी सहकार्य केले. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे संस्कार प्रतिष्ठानने सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा परिचय देत आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मराठवाड़ा की प्यास बुझाएगा 20 हजार करोड़ का वॉटर ग्रिड!

मराठवाड़ा का नाम सामने आते ही सबसे पहले पानी की किल्लत और सूखे की तस्वीर सामने आती है। सालों से यहां के लोग पानी की समस्या से जूझ रहे हैं।…

रोटरी क्लब अहिल्यानगरचा ‘स्वर दीपावली’ कार्यक्रम दिमाखात संपन्न!

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा…