शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगार सेवेत कायम; न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

२० वर्षांच्या संघर्षाला यश; कृतज्ञता व्यक्त करत कामगार संघटनेतर्फे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी श्रद्धा आणि सबुरीने केलेल्या २० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. या निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, कामगारांनी दाखवलेली एकजूट आणि विश्वास यामुळेच हा आनंदाचा क्षण सर्वांच्या जीवनात आला आहे. या यशात अनेकांचे योगदान असून, आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्षा जयश्री थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या २० वर्षांच्या लढ्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांनी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र कामगारांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपत आपला संघर्ष सुरू ठेवला. यापूर्वी १,०५२ कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्व. जयंतराव ससाणे आणि आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे तो निर्णय होऊ शकला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

शिर्डीसाठी कोणताही निर्णय घेताना कधीही वैयक्तिक स्वार्थाचा विचार केला नाही. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत राहिलो. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायची, मात्र जनतेशी प्रतारणा करायची नाही, हीच भूमिका कामगारांच्या लढ्यातही कायम ठेवली, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

कामगारांची जबाबदारी आता अधिक वाढली असून, शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे स्वागत, सुरक्षा आणि स्वच्छता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. भाविकांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कामगारांनी पार पाडावी. देशात अनेक आध्यात्मिक स्थळांचा विकास होत असल्याने शिर्डीचा लौकिक टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शिर्डी परिसरातील विकासकामांचा उल्लेख करताना विमानतळ आणि बाह्यवळण रस्त्याच्या कामांमध्ये अनेक अडचणी आल्या आणि टीकाही झाली; मात्र या प्रकल्पांचे महत्त्व आता सर्वांना समजत आहे. निळवंडेचे पाणी आल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही दिलासा देता आला, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांच्या आरोपांना आणि टीकेला आता पूर्णविराम मिळाला असून, आजचा दिवस शब्दपूर्तीचा असल्याचे सांगितले. विखे परिवाराला जनतेकडून मिळणाऱ्या प्रेमाची उतराई करण्याचे काम आपण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कामगारांनी ठेवलेल्या विश्वासाचे फळ आज मिळाले आहे, असे ते म्हणाले. यावेळी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि विठ्ठलराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मराठवाड़ा की प्यास बुझाएगा 20 हजार करोड़ का वॉटर ग्रिड!

मराठवाड़ा का नाम सामने आते ही सबसे पहले पानी की किल्लत और सूखे की तस्वीर सामने आती है। सालों से यहां के लोग पानी की समस्या से जूझ रहे हैं।…

रोटरी क्लब अहिल्यानगरचा ‘स्वर दीपावली’ कार्यक्रम दिमाखात संपन्न!

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा…