अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : सार्वजनिक बांधकाम विभागातून उपअभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले शंकरराव तथा एस.एम. कुलकर्णी यांचे मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
एस.एम. कुलकर्णी यांना अध्यात्माची विशेष आवड होती. शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते नोकरीच्या क्षेत्रात तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


