मुंबई–बंगळुरूसाठी वंदे भारत स्लीपरची तयारी; प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई ते बंगळुरू दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणीसाठी बेंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणार असून, रात्रभराच्या प्रवासासाठी हा एक जलद आणि आरामदायी पर्याय ठरणार आहे.
ही स्लीपर ट्रेन भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) च्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगसंगतीतील या ट्रेनची अंतिम तांत्रिक तपासणी सध्या सुरू असून, त्यानंतरच ती भारतीय रेल्वेच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट केली जाणार आहे.
या ट्रेनमुळे मुंबई, पुणे, बेळगाव, हुबळी-धारवाड आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा वेळेची बचत करणारी ठरणार आहे.देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी 2026 मध्ये हावडा–कामाख्या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावर दुसरी स्लीपर वंदे भारत आणण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज ट्रेन

या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असून सुमारे 823 प्रवाशांची क्षमता आहे. त्यामध्ये 11 एसी 3-टियर, 4 एसी 2-टियर आणि 1 फर्स्ट एसी डब्याचा समावेश आहे. ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किमी इतका असून रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी कंपन आणि आवाज कमी ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ सुरक्षा प्रणाली, आपत्कालीन ‘टॉक-बॅक’ सुविधा, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक स्वच्छतागृहे आणि पूर्ण वातानुकूलित डबे उपलब्ध असतील. त्यामुळे ही ट्रेन प्रवाशांना प्रीमियम दर्जाचा प्रवासाचा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या ट्रेनची अंतिम चाचणी सुरू असून, सर्व मंजुरी मिळाल्यानंतरच तिच्या नियमित सेवेला हिरवा कंदील मिळणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…