E20 पेट्रोलवरून मोठा निर्णय? आता ग्राहकांना मिळू शकतात दोन पर्याय; मोदी सरकारची नवी तयारी

नवी दिल्ली : देशभरात E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वाहनधारकांकडून E20 पेट्रोलमुळे इंजिनवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार ग्राहकांना इंधन निवडीचे दोन पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारसमोर असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, पेट्रोल पंपांवर इथेनॉलमिश्रित पेट्रोल (E20) आणि साधे पेट्रोल असे दोन पर्याय उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या क्षमतेनुसार आणि वापराच्या गरजेनुसार योग्य इंधन निवडता येईल.सध्या हा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ग्राहकांना इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. विशेषतः जुन्या वाहनांच्या मालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
सरकारने अद्याप या प्रस्तावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे दोन प्रकारचे पेट्रोल नेमके कधीपासून उपलब्ध होणार, याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अंतिम निर्णयानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…