देऊळ बंद 2’च्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; फडणवीसांनी टीमचे केले कौतुक

मुंबई : प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानंतर ‘देऊळ बंद 2’च्या संपूर्ण टीमने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक करत टीमच्या कामगिरीचे अभिनंदन केले. मुंबई येथे पार पडलेल्या या भेटीत त्यांनी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकद या चित्रपटात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद आनंददायी आहे.” तसेच त्यांनी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीला निर्माते कैलाश वाणी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच पीआर आणि मार्केटिंग क्षेत्रातील कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडे म्हणाले की, “प्रेक्षकांनी चित्रपटावर दाखवलेले प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेले कौतुक आणि दिलेली शाबासकी संपूर्ण टीमचा उत्साह वाढवणारी आहे.”
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक ‘देऊळ बंद 2’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे गर्दी करत असून दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…

अवैध सावकारांवर तात्काळ कारवाई करा : आ. हेमंत पाटील यांचे निर्देश

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : खासगी सावकारांनी वसुलीसाठी खासगी गुंडांच्या टोळ्या तैनात केल्या असून, फायनान्स कंपन्यांचे चालक ग्रामीण भागात दरमहा १० ते २० टक्के व्याजदराने पैसे वाटत आहेत. रिक्षाचालक, ट्रक-टेम्पो चालक…