अवैध सावकारांवर तात्काळ कारवाई करा : आ. हेमंत पाटील यांचे निर्देश

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : खासगी सावकारांनी वसुलीसाठी खासगी गुंडांच्या टोळ्या तैनात केल्या असून, फायनान्स कंपन्यांचे चालक ग्रामीण भागात दरमहा १० ते २० टक्के व्याजदराने पैसे वाटत आहेत. रिक्षाचालक, ट्रक-टेम्पो चालक तसेच हातावर पोट भरणाऱ्या भाजी विक्रेत्यांना छोट्या रकमा देऊन मूळ मुद्दलाच्या ५ ते १० पट रक्कम वसूल केली जात आहे. या माध्यमातून मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून, अशा फायनान्स चालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

अतिव्याजाच्या वसुलीसाठी गरीब शेतकऱ्यांची घरे आणि शेतजमिनी बळकावून बॉण्डपेपरवर बळजबरीने रजिस्ट्री करून घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळलेल्या तरुण शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी हरिद्रा केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. पीडित कुटुंबाच्या पुढील आयुष्याची आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलेल, अशी ग्वाहीही आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…