महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री निश्चित? ७-८ जूनदरम्यान आगमनाची शक्यता

मुंबई : नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू असून येत्या ७ ते ८ जूनदरम्यान तो राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाच्या विविध अंदाज मॉडेल्सनुसार मॉन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झाले आहे.केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी परिसरात मॉन्सूनसदृश ढगांची घनता वाढत असल्याचे उपग्रह निरीक्षणांमधून स्पष्ट झाले आहे. तसेच कोची येथील डॉपलर रडारमध्ये मध्यम तीव्रतेचे ढगांचे पट्टे दिसून येत असल्याने मॉन्सूनच्या पुढील प्रवासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘टायफून जांगमी’चे रूपांतर बाह्यउष्णकटिबंधीय कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यामुळे नैऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यांना उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मॉन्सूनच्या मुख्य प्रवाहाला वेग मिळत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनचा पट्टाही अधिक सक्रिय होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचे उर्वरित क्षेत्र तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यामुळे दक्षिण कोकण, गोव्यालगतचा दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रारंभीच्या मॉन्सून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील अधिकृत प्रवेशाकडे लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…