रुग्ण सुरक्षा व गुणवत्ता सुधारणा विषयावर नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून १० क्रेडिट पॉइंट्स; २१२ परिचारिकांचा सहभाग

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने ‘रुग्ण सुरक्षा व नर्सिंग व्यवस्थापनातील गुणवत्ता सुधारणा’ या विषयावर सातत्यपूर्ण नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे (CNE) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून १० क्रेडिट पॉइंट्स प्रदान करण्यात आले. या उपक्रमात एकूण २१२ परिचारिकांनी सहभाग घेतला.

रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, नर्सिंग सेवांचा दर्जा सुधारणे, रुग्णसेवेतील संभाव्य धोके कमी करणे तसेच सुरक्षित आणि प्रभावी नर्सिंग व्यवस्थापनासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये अद्ययावत करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमासाठी श्रीमती रिना जॉर्ज, प्राचार्य, सेंट ल्यूक कॉलेज ऑफ नर्सिंग अँड हॉस्पिटल, श्रीरामपूर यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी परिचारिकांनी रुग्ण सुरक्षा प्रोटोकॉल, अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे आणि गुणवत्ता सुधारणा प्रक्रियांबाबत आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. रुग्ण सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करूनच सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण नर्सिंग सेवा प्रदान करता येते.”

या उपक्रमासाठी संस्थेचे प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (वैद्यकीय), तसेच डॉ. रामचंद्र पडळकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, अहिल्यानगरच्या मेट्रन श्रीमती जया गायकवाड तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्ग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता औताडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. योगिता औताडे, डॉ. आंब्रपाली संतोष, एनएबीएच समन्वयक, प्राध्यापक अमोल टेमकर, प्राध्यापिका सलोमी तेलधुने आणि डॉ. कविता भोकनळ यांनी व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी रुग्ण सुरक्षा, गुणवत्ता सुधारणा आणि सुरक्षित नर्सिंग व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमामुळे सहभागी परिचारिकांना रुग्ण सुरक्षा, गुणवत्ता सुधारणा आणि सुरक्षित नर्सिंग व्यवस्थापनासंदर्भात अद्ययावत ज्ञान मिळाले. तसेच रुग्णकेंद्रित, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातील श्री. राहुल कडू, श्री. अमोल अनाप, श्री. गणेश घोलप, श्री. विशाल पुलाटे, श्री. दिनेश मगर, श्री. प्रशांत अम्ब्रीत, सौ. संपदा म्हस्के आणि स्नेहल घोडेराव यांनी विशेष सहकार्य केले. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून नर्सिंग व्यावसायिकांच्या ज्ञानवृद्धीला आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेला प्रोत्साहन मिळाले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अवैध सावकारांवर तात्काळ कारवाई करा : आ. हेमंत पाटील यांचे निर्देश

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : खासगी सावकारांनी वसुलीसाठी खासगी गुंडांच्या टोळ्या तैनात केल्या असून, फायनान्स कंपन्यांचे चालक ग्रामीण भागात दरमहा १० ते २० टक्के व्याजदराने पैसे वाटत आहेत. रिक्षाचालक, ट्रक-टेम्पो चालक…

वाडी बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री शामरावजी कदम यांचे नाव द्या!

नांदेड, (प्रतिनिधी) : नांदेड शहरालगतच्या वाडी बुद्रुक अर्थात पावडेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला सहकारमहर्षी पद्मश्री कै. शामरावजी कदम यांचे नाव देण्यात यावे, तसेच ज्येष्ठ महिला व…