अमरावतीत नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक अत्याचार; मैत्रिणींचा सहभाग उघड

अमरावती : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीला जाळ्यात ओढून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी करण सुदर्शन मनोहर (२७, प्रिया कॉलनी, महादेवखोरी) आणि साहिल ऊर्फ गोलू अरुण अंभोरे (२६, वरुणनगर, अमरावती) यांना अटक केली आहे. तसेच या कटात दोन युवतींचाही सहभाग असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पीडित युवतीला नोकरीची गरज असल्याने तिच्या मित्राने तिची ओळख एका युवतीसोबत करून दिली होती. संबंधित युवतीने तिचा विश्वास जिंकत तिला आपल्या खोलीवर नेले आणि नंतर दुसऱ्या युवतीशीही ओळख करून दिली. त्यानंतर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तिला शहरातील दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे काही व्यक्तींशी संबंध ठेवल्यास भरपूर पैसे मिळतील, असे तिला सांगण्यात आले. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला.
यानंतर ती एका मैत्रिणीकडे राहण्यासाठी गेली. दोन दिवसांनंतर मैत्रीण गावाला जाणार असल्याने तिने पीडितेला पुन्हा नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या युवतीच्या ताब्यात दिले. संबंधित युवतीने पीडितेला दुचाकीवरून नेताना मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत एका घरात नेले. त्या ठिकाणी साहिल ऊर्फ गोलू अंभोरे आणि करण मनोहर उपस्थित होते.
तक्रारीनुसार, संबंधित युवती तेथून निघून गेल्यानंतर साहिल आणि करण यांनी पीडितेला धमकावत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींसह कटात सहभागी असलेल्या दोन युवतींविरुद्ध अपहरण, अत्याचार आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…