सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब

नासिक. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये तब्बल 22 किलोहून अधिक तफावत आढळल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनुसार, जुन्या नोंदींमध्ये 406 किलो चांदी वापरण्यात आल्याचा उल्लेख आहे, मात्र प्रत्यक्ष मोजणीदरम्यान केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून, प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवण्यात आले आहे. अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशीदरम्यान चांदी काढताना पंचनामा, अधिकृत वजन आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया नियमांनुसार न झाल्याची कबुली दिल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणाविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी जानेवारी 2026 पासून आंदोलन छेडले होते, मात्र सुरुवातीला प्रतिसाद न मिळाल्याने प्रकरण राज्य माहिती आयोगापर्यंत गेले आणि त्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. आता या प्रकरणात ट्रस्टचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी होत असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानातील कथित भ्रष्टाचारामुळे संतापाची लाट उसळली आहे.

Related Posts

टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…