पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे, कोल्हापूर आणि सांगलीत विशेष मोहिम; नियमभंग, लेबल त्रुटी आणि भेसळीवर प्रशासनाचा कडक पवित्रा

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. लेबलमधील त्रुटी, नियमांचे उल्लंघन आणि भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील मार्केट यार्ड येथील बी. जी. गोयल अँड कंपनी या आस्थापनाची तपासणी करताना हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने घेण्यात आले. तपासणीदरम्यान ४,१७२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी आहे. परवान्यात आवश्यक बदल न करणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित व्यापाऱ्याला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली आहे. पुणे शहरातील बोपोडी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आस्थापनांवर छापे टाकून २२ हजार ७८९ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटकही करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने दोन गोठ्यांवर छापे टाकले. रामचंद्र धोंडीराम पाटील यांच्या गोठ्यात डेअरी परमिट पावडर आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा वापर करून दूधभेसळ होत असल्याचे आढळले. याप्रकरणी संबंधितासह पावडर पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.याच गावातील बजरंग बाबासो पाटील यांच्या गोठ्यात रिफाइंड सूर्यफूल तेलाचा वापर करून दूधभेसळ होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला असून ५४ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.

विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एफडीएने केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…