भोंदूबाबाने चिमुकल्याला दाताने उचलत गरागरा फिरवले, उलटं-पालटं केलं; अकोल्यात अंधश्रद्धेचा कळस

अकोला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात अंगावर शहारे आणणारा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चेतन सुनील मुळे नावाच्या भोंदू बाबाचा उल्लेख समोर आला असून त्याने चिमुकल्यावर जीवघेणे उपचार केल्याचा आरोप आहे. त्या भोंदूने बाळाला आपल्या दाताने उचलले आणि गरागरा फिरवल्याचं दिसून आलं. या अघोरी प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लहान मुलांच्या समस्यांवर उपाय म्हणून अघोरी पद्धतींचा अवलंब केला जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात संबंधित भोंदू एका लहान बाळाला थेट दाताने उचलताना दिसत आहे. एवढंच नाही, तर तो बाळाला गोल गोल फिरवत असल्याचंही दिसून येतं. यावेळी बाळ रडत असतानाही आजूबाजूचे लोक शांतपणे पाहत असल्याचं चित्र धक्कादायक आहे.
व्हिडीओमध्ये पुढे तोच बाबा बाळाला उलटं-पालटं करताना दिसतो. अशा प्रकारे जीव धोक्यात घालणारे उपचार सुरू असताना पालक आणि उपस्थित लोक अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकारामुळे बालकाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
हा संपूर्ण प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी केला जात होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या भोंदू बाबाची पूर्ण ओळख आणि त्यामागील हेतू देखील स्पष्ट झालेला नाही. मात्र हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातील असल्याचं समोर येत आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार होत असल्याचं चित्र चिंताजनक आहे. एका बाजूला समाज सुधारण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अशा घटनांमुळे सामाजिक जागरूकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, लहान मुलांचाही जीव अशा प्रकारांमुळे धोक्यात येत असल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…