वसुबारसेला कोतुळमध्ये सामूहिक सवत्स गोमाता पूजन

‘श्री वरदविनायक’ देवस्थानचा धार्मिक उपक्रम

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जागृत व नवसाला पावणारे प्रसिद्ध ‘श्री वरदविनायक देवस्थान’ नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार अनादी काळापासून गोमाता पवित्र व पूजनीय मानली जाते. कामधेनू गोमाता ही भारतीय शेती आणि आरोग्याचा आधार आहे. भगवान प्रभू रामचंद्र यांच्या कुळातील राजा दिलीप यांच्यापासून भगवान श्रीकृष्ण ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गोमातेची सेवा केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच गोमातेला आईचा बहुमान प्राप्त झाला आहे. अशा सवत्स (वासरासह) गोमातेचे दीपावलीपूर्वी येणाऱ्या द्वादशीला अर्थात वसुबारसेच्या दिवशी श्रद्धापूर्वक पूजन करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जपली जाते.

कोतुळ येथील ‘श्री वरदविनायक देवस्थान ट्रस्ट’ व ‘जयभवानी संस्कृती संवर्धन मंडळ, कोतुळ’ यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सामूहिक ‘सवत्स धेनू’ पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गोपूजन सोहळ्यास गोप्रेमी भाविक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे, विनय समुद्र, कुलदीप नेवासकर, सचिन पाटील, प्रा. संभाजी पोखरकर, अजित आरोटे, सागर सोनुले, संतोष घाटकर, विद्या परशुरामी, वृषाली समुद्र, प्रियंका पाटील व वर्षा नेवासकर यांनी केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

सिकलसेल व थॅलेसेमिया जनजागृतीसाठी इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथचा पुढाकार

नागपूर : इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे सिकलसेल व थॅलेसेमिया या अनुवंशिक आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत 21 सप्टेंबर रोजी गजानन कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी…

देव-देश-धर्म संकल्पनेतून ‘द भक्ती बीट्स’चा अनोखा संगीताविष्कार; अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : ‘देव-देश-धर्म’ या संकल्पनेतून अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने ‘द भक्ती बीट्स’ या भजन जॅमिंग अँड फ्युजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावीर ग्रुपच्या विशेष सहकार्याने तसेच…