सिकलसेल व थॅलेसेमिया जनजागृतीसाठी इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथचा पुढाकार

नागपूर : इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे सिकलसेल व थॅलेसेमिया या अनुवंशिक आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत 21 सप्टेंबर रोजी गजानन कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 500 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीत सिकलसेल पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी 30 ऑक्टोबर रोजी विशेष मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. लोक कल्याण डायग्नॉस्टिक सेंटरचे संचालक डॉ. तुंगारे आणि डॉ. प्रशांत अन्सिंगकर यांनी सिकलसेल व थॅलेसेमियाचे स्वरूप, आहार, आवश्यक उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पालकांना वैयक्तिक समुपदेशनही करण्यात आले.

क्लबच्या अध्यक्षा श्रीमती कविता दुरगकर यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले की, हे आजार अनुवंशिक असले तरी पालकांनी एकमेकांना दोष देण्याऐवजी मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांना सुरक्षित आणि निरोगी भविष्य देण्यासाठी पालकांनी सजग राहावे. तसेच भारताला 2047 पर्यंत सिकलसेल व थॅलेसेमियामुक्त करण्याच्या राष्ट्रीय ध्येयासाठी क्लबतर्फे सातत्याने योगदान व सहकार्य देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाघ यांनी केले. इनर व्हील क्लबच्या ज्येष्ठ सदस्या डॉ. स्नेहल भावे, अनिता धुरवे आणि वैशाली फुलकर यांचीही उपस्थिती होती. पालकांच्या सक्रिय सहभागामुळे हा जनजागृती उपक्रम यशस्वी झाला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

देव-देश-धर्म संकल्पनेतून ‘द भक्ती बीट्स’चा अनोखा संगीताविष्कार; अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : ‘देव-देश-धर्म’ या संकल्पनेतून अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने ‘द भक्ती बीट्स’ या भजन जॅमिंग अँड फ्युजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावीर ग्रुपच्या विशेष सहकार्याने तसेच…

चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये तीन यशस्वी शस्त्रक्रिया

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : चेहऱ्याच्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्लास्टिक सर्जरी विभागाने तीन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे,…