शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी

‘कर्मेंद्रिया’ पुस्तकातून शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनाचा उलगडा

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन कसे राखावे, याचे मार्गदर्शन रमेश खाडे लिखित ‘कर्मेंद्रिया : शरीर, मन और आत्मा का संतुलित विज्ञान’ या पुस्तकातून मिळेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिरूर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी शकुंतला दिदी यांनी केले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिवाजीनगर केंद्रातर्फे रमेश खाडे लिखित ‘कर्मेंद्रिया : शरीर, मन और आत्मा का संतुलित विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १) राजयोगिनी शकुंतला दिदी यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे, टायनी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम जाधव, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, डॉ. राम खर्चे आणि शारदा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुस्तक लेखनाविषयी बोलताना रमेश खाडे म्हणाले, प्रत्येकजण आज स्वसंवाद हरवून बसला आहे. स्वसंवादासोबतच मानसिक संतुलन साधता यावे, यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, पुस्तकाच्या माध्यमातून रमेश खाडे यांनी जीवनमूल्यांचा अर्थ सोप्या भाषेत मांडला आहे. बोधपर कथांमधून वाचकांना जीवनाचे सार समजून घेता येईल. सचिन आपटे म्हणाले, संस्कारांची जपणूक करणे, चुकीच्या सवयी दूर सारणे आणि स्वतःच्या विचारांनुसार कृती करणे यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. यावेळी शांताराम जाधव आणि डॉ. राम खर्चे यांनीही मनोगत व्यक्त केले. शारदा दिदी यांनी सूत्रसंचालन केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीविरोधात खासदार डॉ. अनिल बोंडे आक्रमक; संसदेत आवाज उठवणार!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यपदार्थांसह विविध उत्पादनांवर खासगी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत या व्यवस्थेविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार हिंदू राष्ट्र समन्वय समितीने…

मुंबईकरों के लिए बड़ी राहत! मनोरी में बनेगा समुद्र के पानी को पीने लायक बनाने वाला प्रोजेक्ट

मुंबई : देश की आर्थिक राजधानी मुंबई में बढ़ती आबादी के साथ पानी की मांग भी लगातार बढ़ रही है। ऐसे में भविष्य में पानी की कमी से निपटने के…