अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सुगम संगीताच्या कार्यक्रमाने रंगली ज्येष्ठांची मैफल; स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरनगर येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी देविदास आगरकर, मनोहर चांगदे, ॲड. शरद अरमरकर, विनायक अशेट्टीवार, भोजराज कदम, रुक्मानंद मुंगळे, ललित घोंगे, सौ. पुष्पा पवार, सौ. उषा कातुलवार, सौ. शालिनी वाकडे, सौ. वनिता चौधरी, सौ. नलिनी शिरपूरकर, सौ. मालती गौरखेडे आणि सौ. कमल भांदककर यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतराव इझनकर, गणपतराव निंबाळकर, विलास वाकडे, धनराज भोयर, रमेश जिल्हारे, श्री हिरुळकर, रामेश्वर कांबळे, रामकृष्णाजी बांगडे, श्री कोहाड, डॉ. राजेश कुऱ्हाडे, देवानंद दुधे, ॲड. अरमरकर, चांगदे, सौ. शोभा आगरकर, दत्तात्रय उदापुरे, सरिता धनजोड, सौ. जया रासेकर, सौ. मालती गौरखेडे, सौ. ज्योती निंबाळकर आणि सौ. रेखा काठीकर यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला सौ. गौरखेडे, सौ. भोयर, सौ. ज्योती निंबाळकर, शेषराव ठाकरे, श्री वाकोडीकर, मस्के, शिंगरू, बागडे, खोडे, भोगे, शिंदे, देवानंद दुधे, गौतम वरघट, धनराज भोयर, प्रकाश गोजे, शिरपूरकर, बावनकर यांच्यासह मंडळाचे इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर विजयकुमार बावनकर, वाचनेकर, माधुरीताई पाखमोडे, वंदनाताई वारके, श्री पाखमोडे आणि सौ. वाचनेकर यांच्या चमूने सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे…

हिंदू तत्त्वज्ञानात मानव कल्याणाचा विचार : डॉ. रविकुमार अय्यर

पुणे : मानसिक आजारांचे वाढते आव्हान, कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास आणि वाढता मूलतत्त्ववाद यामुळे जगभरात संघर्षाचे सावट पसरले आहे. अशा वेळी सकल सृष्टीच्या कल्याणाचा ध्यास घेणारे हिंदू तत्त्वज्ञानच विश्वाला योग्य दिशा दाखवू…