जनजाती गौरव यात्रेचे अशोक स्तंभावर पुष्पवृष्टीने भव्य स्वागत

भाजप मध्यमंडल आणि कामगार मोर्चातर्फे ६५०० जनजाती बांधवांचे स्वागत; सामाजिक समरसतेचा संदेश

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त आयोजित गोदा महाआरतीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या ६५०० जनजाती बांधवांच्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी मध्यमंडल आणि भाजप कामगार मोर्चाच्या वतीने अशोक स्तंभ येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करून जनजाती बांधवांचे स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्यादरम्यान ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘भारत माता की जय’, ‘बिरसा मुंडा की जय’ आणि ‘राणी दुर्गावती की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला मध्यमंडल अध्यक्ष वसंत उशीर, कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे, नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, अनिल भालेराव, रवींद्र गांगुर्डे, विनोद येवले, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, हेमंत शुक्ल, गणेश कांबळे, विद्याताई चौधरी, वैशाली जोशी, रेखा टाक, आदित्य सोनवणे, सुरज राठी, ऋषिकेश ठाणगावकर, गौरव जाधव, अनिकेत शिंदे, रोशन पालवे, मंदार पिंगळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोभायात्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा तसेच सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा हा श्रद्धेचा महासंगम असून, या महासंगमाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक येथील रामकुंडावर, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली आहे. या माध्यमातून भारतीय जनमानसातील आस्था आणि सामाजिक समरसतेचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीविरोधात खासदार डॉ. अनिल बोंडे आक्रमक; संसदेत आवाज उठवणार!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यपदार्थांसह विविध उत्पादनांवर खासगी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत या व्यवस्थेविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार हिंदू राष्ट्र समन्वय समितीने…

मुंबईकरों के लिए बड़ी राहत! मनोरी में बनेगा समुद्र के पानी को पीने लायक बनाने वाला प्रोजेक्ट

मुंबई : देश की आर्थिक राजधानी मुंबई में बढ़ती आबादी के साथ पानी की मांग भी लगातार बढ़ रही है। ऐसे में भविष्य में पानी की कमी से निपटने के…