नांदेड : सकाळी झालेले उद्घाटन जनतेच्या मनात अवैध – आ. हेमंत पाटील

वाडी येथील शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून ठाकरे गटावर निशाणा; निधी आणि प्रकल्प जनसेवेत रुजू होणे महत्त्वाचे असल्याचे मत

नांदेड : वाडी येथील शासकीय रुग्णालयाचे उद्घाटन आज सकाळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. या उद्घाटनावर विधान परिषदेतील शिवसेना (शिंदे गटाचे) गटनेते आ. हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारे येतात आणि जातात, मंत्रीही बदलत राहतात. मात्र, भूमिपूजन कोणी केले यापेक्षा या प्रकल्पासाठी निधी कोणी उपलब्ध करून दिला आणि हा प्रकल्प लोकांच्या सेवेत कधी सुरू होतो, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे आ. पाटील म्हणाले. महाराष्ट्रात यापूर्वी पहाटे झालेले शपथविधी असोत किंवा इतर कोणतेही उद्घाटन, ते न्यायालयाने अवैध ठरविले आहेत. तसेच जनतेच्या मनातही अशा प्रकारची उद्घाटने अवैधच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुंबईकरों के लिए बड़ी राहत! मनोरी में बनेगा समुद्र के पानी को पीने लायक बनाने वाला प्रोजेक्ट

मुंबई : देश की आर्थिक राजधानी मुंबई में बढ़ती आबादी के साथ पानी की मांग भी लगातार बढ़ रही है। ऐसे में भविष्य में पानी की कमी से निपटने के…

अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…