जागवू राष्ट्रशक्ती अपार; राष्ट्रसेविका समितीचे सघोष पथसंचलन उत्साहात

विजयादशमीनिमित्त नाशिकमध्ये शिस्तबद्ध पथसंचलन; नागरिकांकडून पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत

नाशिक (प्रतिनिधी) : ‘संघटनेच्या महामंत्राने, जागवू राष्ट्रशक्ती अपार, समर्पणाच्या तेजातून, घडवू तेजस्वी राष्ट्र साकार’ या ब्रीदाप्रमाणे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रविवारी (दि. २५) शहरातून सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. महिला वर्गाच्या उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध सहभागामुळे शहरातील वातावरण भारावून गेले.

कॉलेज रोड परिसरातील एच. पी. टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. सायन्स कॉलेजच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली, तर ८ वाजता मुख्य पथसंचलनाला प्रारंभ झाला. घोष पथकाच्या तालावर आणि शिस्तबद्ध पावलांनी निघालेल्या या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. हे पथसंचलन दोन नियोजित मार्गांवरून पार पडले. एच. पी. टी. कॉलेज मैदानावरून पहिल्या वाहिनीच्या संचलनाला सुरुवात झाली. मिलेनियम गेट, वृंदावन मिसळ, बॉइज टाऊन चौक, सहजीवन कॉलनी, मालपाणी हॉस्पिटल आणि व्हिजन हॉस्पिटल मार्गे कॉलेज रोडवरून हे संचलन पुन्हा मैदानावर परतले.

दुसऱ्या मार्गावरील संचलन कॉलेज रोड सिग्नल, डी डेकोर, मॉडर्न कॅफे, रघुकुल बिल्डिंग, कुलकर्णी बाग, कलश अपार्टमेंट, ब्रँड लाउंज आणि श्रद्धा मॉल मार्गे एच. पी. टी. मैदानावर पोहोचले. येथे संचलनाचा समारोप झाला. संचलनादरम्यान संपूर्ण मार्गावर मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे उत्साहात स्वागत केले. राष्ट्रसेविका समितीच्या या संचलनातून नाशिकमध्ये राष्ट्रशक्ती, शिस्त आणि संघटनभावनेचे दर्शन घडले.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…