रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्थेचा पुढाकार; पहिल्या दिवशी १०५ श्वानांचे लसीकरण

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली. इंद्रायणी नगर येथील सर्कल चौक तसेच पांजरपोळ येथील डॉक्टर्स डिव्हाईन कर्म व्हेटर्नरी पॉलीक्लिनिक येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

स्व. रतनजी टाटा साहेबांना भटक्या श्वानांविषयी विशेष प्रेम, आस्था आणि आपुलकी होती. ते नेहमी म्हणत असत, “कुत्रा विकत घेऊ नका, दत्तक घ्या.” प्राणी माणसांपेक्षा अधिक निष्ठावान असतात, कारण ते स्वार्थासाठी प्रेम करत नाहीत. त्यांच्या या प्राणीप्रेमातूनच अनेक उपक्रमांना चालना मिळाली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ही मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण, रक्ततपासणी आणि एक्स-रे करण्यात आले. स्व. रतनजी टाटा साहेबांच्या आवडत्या कार्याला मानवंदना देणे आणि समाजहित जपणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रेबीज लसीकरणामुळे भटक्या श्वानांमुळे होणाऱ्या रेबीजच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून, सामाजिक बांधिलकीचा संदेशही यातून दिला जात आहे. सामाजिक बांधिलकी हा टाटा मोटर्सचा मूलभूत मूल्यविचार आहे.

दिनांक ९ व १० ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात डॉक्टर्स डिव्हाईन कर्म व्हेटर्नरी पॉलीक्लिनिक, हिलिंग युनिव्हर्सल आणि उज्ज्वल भारत संस्था यांच्या ५० ते ६० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी ७० भटके आणि ३५ पाळीव अशा एकूण १०५ श्वानांचे मोफत लसीकरण, रक्ततपासणी व एक्स-रे करण्यात आले. डॉ. दत्तात्रय कांबळे आणि वानखेडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी कर्नल राणा, डॉ. लतिफ मुलाणी आणि बर्मन यांचीही उपस्थिती लाभली.

दुपारनंतर टाटा मोटर्स विंगर विभागाचे प्रमुख श्री. संजय वाघचौरे सर तसेच सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. रोहित सरोज सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. मनोज गाडगे, श्री. धनंजय शहाणे, श्री. सुनील कासार, श्री. विनायक चितळे आणि श्री. अजय धनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मनोज गाडगे यांनी आपल्या मनोगतातून स्व. रतनजी टाटा साहेबांच्या प्राणीप्रेमाचे स्मरण करत उपस्थितांचे आभार मानले. साहेबांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे नेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

डॉ. दत्तात्रय कांबळे यांनी दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम, रेबीज जनजागृती अभियान आणि प्राणीसेवा उपक्रम राबवून स्व. रतनजी टाटा साहेबांना आदरांजली वाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मृतीदिनानिमित्त पांजरपोळ येथील गोमातांना चारा दानही करण्यात आले. पितृपक्षात गोमातांना चारा दान करणे पुण्यकारक मानले जाते. या उपक्रमातून साहेबांच्या स्मृती जागृत राहतील आणि त्यांच्या सेवाभावी विचारांचे स्मरण होईल, हीच या कार्यामागील भावना होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महमंदशरीफ मुलाणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद मराठे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल तळेकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बाबर, टाटा मोटर्स विंगर परिवाराचे धनाजी साळुंखे, रघुनाथ फेगडे, मनोज महाजन, पांडुरंग सुतार, सतीश काळभोर, मोहन कोरडे, प्रवीण वडेलकर, पंढरीनाथ बहिरट आणि राजेंद्र चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

बडनेऱ्यात सनी सायकल स्टोअरला भीषण आग; दीड कोटींच्या नुकसानीचा अंदाज!

बडनेरा , रविकुमार बनसोड (प्रतिनिधी) :  शहरातील गजबजलेल्या जय हिंद चौक परिसरातील सनी सायकल स्टोअरला सोमवारी भीषण आग लागल्याने व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या आगीत अंदाजे दीड कोटी रुपयांचे…