अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : ‘अहर्निशी सेवांमहे’ हे ब्रीद घेऊन रुग्णसेवेचा ध्यास जपत राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आरोग्य भारतीच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील ‘कार्य तपस्वी’चा गौरव करण्यात येणार आहे. आरोग्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव डॉ. किशोर पुरकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. केदारनाथ चांडक यांच्या स्मरणार्थ ‘व्यक्ती ते समष्टी’ हा स्वास्थ्यविचार घेऊन आरोग्य भारती संस्था कार्यरत आहे, असेही डॉ. पुरकर यांनी सांगितले. शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत केडगाव येथील प.पू. डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुलातील सरस्वती विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुहासराव हिरेमठ तसेच आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आरोग्य भारती अहिल्यानगर जिल्हा टीममधील डॉ. जयदीप देशमुख, डॉ. अरुण वैद्य, डॉ. अजित फुंदे, डॉ. श्रीपाद शिंदीकर, डॉ. मधुकर भोर, डॉ. मैत्रेयी लिमये, राजेश परदेशी, डॉ. सौ. पौर्णिमा पुरकर, कैलास चोथे, योगेश सेतवाल, डॉ. रेणुका जोशी आणि जाकीर शेख प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


