नांदेड : पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम; मी राष्ट्रवादीतच – प्रताप पाटील चिखलीकर यांचे स्पष्टीकरण

दादांच्या पश्चातही राष्ट्रवादीत राहून काम करणार; पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे स्पष्ट

नांदेड , रविंद्र औंढेकर(जिल्हा प्रतिनिधी): मी दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या गेल्या ८ ते १० दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून सुरू असलेल्या चर्चांवर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. आपण कोणत्याही पक्षात जाण्याबाबत चर्चा केलेली नसून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना चिखलीकर म्हणाले की, मी पक्षांतर करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. एखाद्या पक्षाच्या कोअर कमिटीत मी येणार की नाही, यावरही चर्चा सुरू आहे. मात्र, मुळात ज्या पक्षात मी जाणार असल्याचे म्हटले जात आहे, त्या पक्षातील लोकांना याबाबत विचारायला हवे होते. आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. मी भारतीय जनता पक्षात काम केले. त्यावेळी व्यंकराव पाटील जिल्हाध्यक्ष, तर प्रवीण साले शहराध्यक्ष होते. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही केलेले काम संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. लोकसभेची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर हरलो. पुढे नेतृत्वस्तरावर तडजोड झाली आणि मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे लागले.

आदरणीय दादांच्या (अजित पवार) नेतृत्वाखाली मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्या मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद दिले आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो. माझा स्वभाव असा आहे की, दुर्दैवाने पक्ष बदलावा लागला तरी ज्या पक्षात राहतो, तो पक्ष वाढला पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे काम करतो, असेही त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वाढावी यासाठी प्रयत्न केले. दादांनी पुण्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दौरे नांदेड जिल्ह्यात केले. माझ्या विनंतीवरून अनेक माजी आमदार आणि जिल्हा परिषद पदाधिकारी दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, असे चिखलीकर यांनी नमूद केले.

मात्र, अलीकडे पक्षाच्या बैठकांमध्ये मी पक्षात येऊ नये, अशा चर्चा होत असल्याची बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. माझे आणि दादांचे संबंध कसे होते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दादांच्या पश्चातही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून काम करणार आहे, असे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…