रंधा फॉलजवळील आद्यस्वयंभू श्री घोरपडा देवी मंदिरात माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतले दर्शन

रंधा फॉलच्या विकासात माजी आमदार पिचड यांचे मोलाचे योगदान

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रंधा फॉलच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांनी सोमवारी रंधा फॉल येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या आद्यस्वयंभू श्री घोरपडा देवी मंदिरात सदिच्छा भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत आरती करून देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

रंधा फॉल परिसराला पर्यटनाच्या नकाशावर विशेष ओळख मिळवून देण्यात वैभवभाऊ पिचड यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या भेटीदरम्यान आद्यस्वयंभू श्री घोरपडा देवीच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…