वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस, कंत्राटी कामगारांना अ‍ॅडव्हान्स द्या!

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : सन २०२५-२६ या वर्षासाठी वीज कर्मचाऱ्यांचा वाढीव बोनस व सानुग्रह अनुदान त्वरित जाहीर करावे, तसेच कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी एक महिन्याचा आगाऊ पगार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केली आहे. याबाबत महासंघाचे महामंत्री अरुण पिंपळ यांनी संबंधित वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील अधिकारी, अभियंते, कर्मचारी व कंत्राटी कामगार ऊन-पाऊस आणि आपत्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी सेवा देतात. सणासुदीच्या काळातही कर्तव्य बजावणाऱ्या या कामगारांच्या श्रमांचा विचार करून त्यांना योग्य आर्थिक लाभ द्यावा, असे महासंघाने म्हटले आहे.

नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही बोनसचा लाभ मिळावा, यासाठी कंत्राटदारांना स्पष्ट आदेश द्यावेत. तसेच सर्व कंत्राटी कामगारांना दसरा-दिवाळीपूर्वी एक महिन्याचा आगाऊ पगार द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…