अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : ७२ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात ‘हमसफर’ या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माते नरेंद्रभाई फिरोदिया व दिग्दर्शक अभिजित दळवी यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘हमसफर’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या विभागात मानाचा ‘रजत कमल’ पुरस्कार मिळाला. एकतानगर (केवडिया) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकही संवाद नाही. केवळ मूक अभिनय आणि संगीताच्या माध्यमातून हा लघुपट साकारण्यात आला आहे. ‘हमसफर’ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल निर्माते नरेंद्रभाई फिरोदिया आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


