सरदार पटेल महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार आणि सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’चे आयोजन २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात करण्यात आले. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे, व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करणे तसेच विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची सकारात्मक भूमिका अधोरेखित करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भरोसा सेल तथा दामिनी पथक प्रमुख असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर प्रज्ञा वाडेकर आणि चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनचे सायबर हायजिन प्रॅक्टिसनर मुजावर अली उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख यांच्यासह विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी युवक हे देशाच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगत व्यसनमुक्त, सशक्त आणि जबाबदार युवा पिढी घडविण्याची गरज व्यक्त केली.

प्रज्ञा वाडेकर यांनी ‘नशामुक्त युवा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांनी दिली. मुजावर अली यांनी व्यसनमुक्त जीवनशैलीसोबतच डिजिटल जगाचा जबाबदारीने वापर, ऑनलाइन प्रलोभनांपासून सावधगिरी आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर पथनाट्य सादर केले. यातून व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त समाजाची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्यात युवकांची भूमिका आणि जनजागृतीसाठी राबविता येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा केली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’च्या बॅनरवर उपस्थितांनी स्वाक्षरी करून नशामुक्त भारताच्या संकल्पाला पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक रोशन चौधरी यांनी केले, तर स्वयंसेविका संजना कैथल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हनुमंतू डंभारे, राजेश इंगोले, रोशन चौधरी, गौरव झाडे, आदित्य मंगरूळकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे आणि जीनेश पटेल यांनी उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…