सरस्वती विद्यालय शंकरनगरच्या मुलींचे बॉल बॅडमिंटनमध्ये तृतीय स्थान

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी ): जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या (DSO) वतीने काँग्रेसनगर येथील DNC महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरशालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय शंकरनगरच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय स्थान पटकावले.

या संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. ब्रिजमोहन रावत, श्री. पुष्पक तांबेकर व श्री. वैभव कुंभरे यांचे मार्गदर्शन लाभले. संघातील अनघा धर्मे, अक्षदा धर्मे, सेजल मिश्रा, सई अवधूत, वास्तवी पाटील, आरोही खैर्या, भूमी ढोके, भावी येडेकर आणि भार्गवी बडवाईक यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक भावना, जिद्द, शिस्त आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवत विद्यालयाचा गौरव वाढविला. विद्यालयाचे व्यवस्थापन (S.I.E.S.), मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका सौ. शैली अय्यर, पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे व श्री. शैलेंद्र ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…