डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

अधिष्ठाता विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  ( जिल्हा प्रमुख ) :  वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. डॉक्टरांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या सेवेसाठी करीत सेवा भाव सातत्याने जपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिष महाजन यांनी केले.

अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘आत्मा गणेश उत्सव २०२६’ अंतर्गत “डॉक्टर आणि समाजकारणातील संधी” या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी डॉ बाळासाहेब पाटील विखे ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ङॉ सुरेश जगदाळे, प्रशासकीय अधिकारी विकास घुले,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाटे यांच्या सह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप कडलग, सचिव डॉ. प्रतीक घोडके, खजिनदार डॉ. निलेश सहाने, तसेच डॉ.नितीन चासकर, डॉ.रविंद्र ङावरे, अकोले हॉस्पिटलचे संचालक ङॉ प्रकाश वाकचौरे, गावडे हॉस्पिटलचे संचालक ङॉ तुषार गावडे ,ङॉ सुभाष सोमण ,ङॉ मंजुश्री रहाणे, ङॉ उमा कुलकर्णी यांच्या सह वैद्यकीय व्यवसाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. महाजन म्हणाले की, डॉक्टर हा समाजातील विश्वासार्ह घटक आहे. रुग्णाच्या उपचाराबरोबरच त्याच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हीदेखील डॉक्टरांची सामाजिक जबाबदारी आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात अनेक नागरिकांना अद्याप दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत नाही. अशा ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन सेवा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

“वैद्यकीय ज्ञानाला जेव्हा सेवाभावाची जोड मिळते, तेव्हा उपचार हे केवळ आजारापुरते मर्यादित राहत नाहीत, तर समाजाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्याचे कार्य घडते,” असे डॉ.जगदाळे यांनी सांगितले. परिसंवादाच्या माध्यमातून डॉक्टरांनी आपल्या व्यावसायिक जबाबदारीसोबतच सामाजिक बांधिलकी जपावी, आरोग्य शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि गरजू रुग्णांसाठी विविध सेवाकार्यांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, यावर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सतीश वाळूंज यांनी केले तर आभार डॉ.रवींद्र डावरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सागर कोल्हाळ, डॉ.संतोष तिकांडे, डॉ.सतीष चासकर, डॉ.तेजस शहा डॉ.अद्वैत देशपांडे, डॉ. संतोष देशमुख आदींनी विशेष प्रयत्न केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…