अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा शहर मंडळाच्या वतीने शहरातील श्री शनि मारुती मंदिरात ७६ दिवे प्रज्वलित करून श्री गणेश व हनुमानाची आरती करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर (आबा) राळेभात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवाभावनेने काम करत असून, हे सेवेचे व्रत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जपले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना आपण करत आहोत. तसेच सेवेची शपथ घेऊन प्रत्येकाने काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. मंडलाध्यक्ष संजय काशिद म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पणाच्या माध्यमातून दहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आज ग्रामदेवालयात दीप उजळून या कार्यक्रमांची सुरुवात करत आहोत. पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये जामखेडकरांनी उपस्थिती दर्शवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न आपण पूर्ण करायचे आहे. मोदीजींनी आपले जीवन जनसेवेसाठी व्यतीत केले आहे. त्यामुळे पुढील आयुष्यात देशसेवेसाठी ईश्वर त्यांना बळ देवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रार्थना आहे.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय (काका) काशिद, जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, भाजपा गटनेते तात्यासाहेब पोकळे, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, शिक्षक नेते प्रा. संजय राऊत, शहर चिटणीस माऊली अंदुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह बाळासाहेब दळवी, डिगांबर चव्हाण, डॉ. अविनाश बांगर, युवक अध्यक्ष ऋषिकेश मोरे, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, अमित चिंतामणी, पवन राळेभात, गणेश डोंगरे, अर्जुन म्हेत्रे, प्रविण होळकर, संजय बेरड, माऊली राळेभात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या आशीर्वादाचा दिवा कार्यक्रमाचे संयोजक मा. श्री. माऊली दादा अंदुरे (शहर सर-चिटणीस) व सहसंयोजक डॉ. अशोक बांगर, विजय कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढा भरवून नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला.


