मोझरी, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथील निवासस्थानी आज महालक्ष्मी पूजन धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे हे आवर्जून उपस्थित होते.
यशोमती ठाकूर यांच्यासह खासदार बळवंत वानखडे आणि कुटुंबीयांनी महालक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करून आरती केली. यावेळी महालक्ष्मी मातेला वंदन करत सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पूजनामुळे निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेनुसार महालक्ष्मी पूजनाचे महत्त्व जपत हा सोहळा श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.


