पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : लक्ष्मीनगर, बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही स्व. शरदअप्पा महादू बालवडकर यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत लक्ष्मी माता मंदिर, लक्ष्मीनगर, बालेवाडी, पुणे-४५ येथे होणार आहे. रक्तदान हे जीवनदान असून, गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. गेल्या १७ वर्षांपासून मंडळाच्या वतीने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी प्रकाश तात्या बालवडकर यांनी नागरिकांना आवाहन करताना, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे आणि गरजूंच्या जीवनाला आधार द्यावा,” असे सांगितले. लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


