हेमराजजी जैन यांच्या जयंतीनिमित्त शारदा महाविद्यालयात रक्तदान शिबिर

प्राणीशास्त्र, शारीरिक शिक्षण विभाग व लायन्स क्लबचा संयुक्त उपक्रम

परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : येथील शारदा महाविद्यालयात स्वर्गीय हेमराजजी जैन यांच्या जयंतीनिमित्त प्राणीशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग आणि लायन्स क्लब, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मान्यवरांनी हेमराजजी जैन यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष विजयकुमार कुचेरिया, रिजनल चेअरमन प्रदीप गोलेच्छा, सचिव संभाजी शेवटे, अ‍ॅड. अशोक सोनी, अनिल जैन, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. विनायक आंबेगावे आणि स्टार पॅथॉलॉजीचे डॉ. अहमद हुसेन उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सोनी यांनी हेमराजजी जैन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. परभणी आणि मराठवाड्याच्या विकासात भाईजींचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. के. के. पाटील आणि प्रा. डॉ. सुनील बल्लाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

या शिबिरात प्रा. आशिष टेकुळे, प्रा. सुरेश जयपूरकर, प्रसाद बुचाले, अल्पेश कुचेरिया, महावीर कुचेरिया, अंबरीश चौधरी आणि नचिकेत अग्रवाल यांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तगट तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील नागरिक आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शाम पाठक यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. रेणुकदास देशपांडे यांनी केले, तर आभार डॉ. नितीन बावळे यांनी मानले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…