शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढा : खासदार संजय जाधव

झरी येथील एसबीआय शाखेला भेट; कर्ज पुनर्गठन प्रक्रिया जलद करण्याची मागणी

परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या झरी परिसरातील शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नावर खासदार संजय जाधव यांनी झरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला भेट देऊन बँक प्रशासनाशी चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, आगामी शेती हंगामासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत कर्जप्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत, याकडे खासदार जाधव यांनी बँक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सातबारा उताऱ्यावर काही बोजा असल्यास त्याबाबत योग्य विचार करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकरी आधीच दुष्काळामुळे त्रस्त आहेत. कर्जासाठी त्यांना वारंवार बँकेत बोलावून त्रास देऊ नका. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आवश्यक कार्यवाही करून कर्जप्रकरणे तातडीने मार्गी लावा, अशी भूमिका खासदार संजय जाधव यांनी मांडली. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास आगामी हंगामाच्या तयारीसाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित कर्जप्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

याशिवाय केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ परिसरातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या सोनल देशमुख, इंजिनीयर होगे पाटील, विशाल देशमुख, ब्रह्मानंद सावंत, दिलीपराव देशमुख, गोपाळ देशमुख, अभिजित देशमुख, बबन महाराज मठपती, कैलास अग्रवाल, घुले पाटील, योगेश शिरडकर, राहुल यादव, बाळासाहेब देशमुख, किरण देशमुख, आबा चौधरी, संतोष देशमुख, कृष्णा राऊत दूधगावकर, पुष्पक देशमुख यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…