निवासी सदनिकेवर सोलर पॅनल बसविण्यास विरोध; रहिवाशांचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड,(प्रतिनिधी) : पंतप्रधानांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले असून, केंद्र व राज्य सरकारकडूनही सौरऊर्जेबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे सिडको परिसरातील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या सदनिकेच्या सार्वजनिक छतावर सोलर पॅनल बसविण्यास सदनिका मालकाकडून विरोध केला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सोलर पॅनल बसविण्यासाठी आलेल्या कामगारांना धमकी देऊन परत पाठविण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

विजेची बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्याच्या उद्देशाने निवासी सदनिकेवर सोलर पॅनल बसविण्याचा प्रस्ताव असताना विरोध होत असल्याने हा विषय चर्चेत आला आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यास विजेच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. मात्र, आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरही सोलर पॅनल बसविण्यास विरोध होत असल्याने संबंधित रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या प्रकरणात संबंधितांची भूमिका जाणून घेऊन नियमानुसार योग्य तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. सदनिकांमध्ये साधारणतः चार ते पाच मजले असल्याने प्रत्येक सदनिकेतील फ्लॅटधारकांना स्वतंत्र सोलर पॅनल बसविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसते. त्यामुळे सार्वजनिक छताचा वापर आणि रहिवाशांचे अधिकार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारच्या समस्या इतर सदनिकांमध्येही निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहते आणि रहिवाशांचा प्रश्न कसा सोडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…