शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविण्यासाठी अग्रीम मदतीचा आधार; बालाजी बच्चेवार यांचे प्रतिपादन

दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारचा निर्णय; पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ठरणार आर्थिक आधार

नायगाव , प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : शेतीतील संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, या उद्देशाने महायुती सरकारने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत आणि पीक विम्याची रक्कम नियमानुसार पुढील काळात मिळणार असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, ही या निर्णयामागील भूमिका असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे बच्चेवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पाच हजार रुपयांच्या मदतीवरून काही विरोधी पक्षांकडून ही रक्कम अपुरी असल्याची टीका केली जात आहे. मात्र, या निर्णयाकडे केवळ मदतीच्या रकमेच्या दृष्टिकोनातून न पाहता, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीचा आधार देण्याच्या भूमिकेतून पाहणे आवश्यक असल्याचे बच्चेवार यांनी नमूद केले. ही मदत शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक अडचणींवर कायमस्वरूपी उपाय नसली, तरी सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या कष्टावरच गावागावांतील बाजारपेठा आणि ग्रामीण जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचा सन्मान राखणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत करणे, या भूमिकेतून शासनाच्या निर्णयाचे मूल्यमापन व्हावे, असे आवाहनही बच्चेवार यांनी केले. दिवाळीचा सण प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जीवनात आनंद, समाधान आणि आशेचा प्रकाश घेऊन यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची सकारात्मक दखल घ्यावी, असेही बालाजी बच्चेवार यांनी म्हटले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाची दखल; तीन मागण्यांना कुलगुरूंची मान्यता, व्यवस्थापन परिषदेच्या भवितव्यावर ४ नोव्हेंबरला बैठक

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रशासनाच्या निर्णयांविरोधात सोमवारी (२ नोव्हेंबर) विविध विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी पक्षांच्या…

रबी फसल बीमा के लिए 15 दिसंबर तक मौका, फार्मर ID अनिवार्य!

नागपुर : रबी सीजन में खेती करने वाले किसानों के लिए राहत की खबर है। मौसम की अनिश्चितता और फसल को होने वाले संभावित नुकसान से आर्थिक सुरक्षा देने के…