सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून तब्बल ५ हजार ५०० विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. यामुळे होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने यंदा विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. गावातून थेट बसची सुविधा मिळाल्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.वारीच्या काळात शासनाच्या विविध योजनांचाही लाभ प्रवाशांना मिळणार आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिला प्रवाशांना तिकीटदरात नेहमीप्रमाणे ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, आपत्कालीन आरोग्य सेवा, माहिती केंद्र तसेच दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय भाविकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती केली जाणार आहे.
वारीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एसटी महामंडळाने पोलिस प्रशासनाशी समन्वय साधत विशेष कृती आराखडा तयार केला आहे. वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक २४ तास कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करावे तसेच विशेष बसची आवश्यकता असल्यास जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; ४० वारकरी असतील तर बस गावातच
MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत
पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…
पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…


