मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? धरणांतील पाणीसाठा अवघ्या ७.५३ टक्क्यांवर

मुंबई : जून महिना संपत आला असतानाही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार सातही धरणांमध्ये मिळून केवळ १,०८,९६७ दशलक्ष लिटर, म्हणजेच ७.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीकपातीची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये जवळपास ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विशेषतः भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा धरण परिसरात अद्याप १०० मिमी पावसाचाही टप्पा गाठलेला नाही. गेल्या २४ तासांतही या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने धरणांतील साठ्यात फारशी वाढ झालेली नाही. अप्पर वैतरणा धरणाची स्थिती आणखी चिंताजनक आहे. धरणाची पाणीपातळी किमान मर्यादेखाली गेल्याने उपयुक्त पाणीसाठा सध्या शून्य नोंदवला गेला असून, तेथून आपत्कालीन स्वरूपात पाण्याचा उपसा सुरू आहे. दुसरीकडे, विहार आणि तुळशी तलाव परिसरात तुलनेने चांगला पाऊस झाल्याने तेथील साठ्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईला दररोज सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्याचा मर्यादित साठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत धरण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, त्याकडेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…