अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी असते. याच भावनेतून शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांच्या वाढदिवसानिमित्त मधुबन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
जीवनाच्या उत्तरार्धात अनेक ज्येष्ठ नागरिक विविध कारणांमुळे कुटुंबापासून दूर राहत असतात. अशा वेळी त्यांना भौतिक मदतीसोबतच प्रेम, आपुलकी आणि मायेच्या स्पर्शाचीही गरज असते. हे लक्षात घेऊन धर्माळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. काही ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगितले, तर अशा भेटींमुळे एकटेपणा कमी होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित न राहता भावनिक नात्यांचा सेतू ठरला. “गरजूंना मदत करण्यातून मिळणारे समाधान कोणत्याही उत्सवापेक्षा मोठे असते. समाजातील वंचित, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हीच खरी वाढदिवसाची भेट आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशा सामाजिक उपक्रमांमधून माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जात आहे. वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक आणि प्रेरणादायी पद्धत अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. उपस्थिती : अमरावती तालुकाप्रमुख दिलीप ठाकरे, उपतालुकाप्रमुख विनोद अर्मळ, आशिष दारोकार, बशीर भाई, तंटामुक्ती अध्यक्ष एऐजाजभाई, कार्तिक गजबिये, अक्षय सूर्यवंशी, प्रवीण ऊके, शंतनू ठाकरे, रविभाऊ काळबांडे, विद्यासागर होले, अंकुश धर्माळे, सौरभ विचुरकर, सनी मोहोळ, बालाजी प्रयाल, मुकद्दर पठाण, गुरुदेव गटरी, राजू घाटी, शैलेश काळबांडे आदी उपस्थित होते.


