वर्षा बंगल्यावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते गणरायाची आरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या मंगलमय सोहळ्यात गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार सर्वश्री अक्षय कर्डिले, शेखर शेखावत, अनिल पाटील, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गणरायाच्या आरतीनंतर उपस्थित मान्यवरांनी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित आमदारांनी एकमेकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न

नांदेड (जिमाका), रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य…

नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती सदिच्छा सोनी पाटील उतरल्या मैदानात!

नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : महापालिकेच्या कार्यालयात एखादे साधे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकाला वारंवार चकरा माराव्या लागतात, टोकन हातात असूनही प्रतीक्षेत बसावे लागते आणि काम कधी होणार याचे…