राजौरीत भूसुरुंगाचा स्फोट; JCOसह 4 जवान जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) मंगळवारी भूसुरुंगाचा स्फोट होऊन एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) आणि तीन जवान जखमी झाले. नौशेरा सेक्टरमधील कलाल परिसरात ही घटना घडली. नियमित गस्तीदरम्यान झालेल्या या स्फोटामुळे काही काळ सीमेवरील परिसरात खळबळ उडाली.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची एक तुकडी सीमेवर नियमित गस्त घालत होती. याच वेळी अचानक भूसुरुंगाचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. घटनेची माहिती मिळताच जवळील चौक्यांवरील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्फोटात जखमी झालेल्या JCOसह चारही जवानांना त्वरित प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीमेपलीकडून होणारी दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील काही भागांमध्ये भूसुरुंग पेरले जातात. मात्र, मुसळधार पाऊस, पूरस्थिती किंवा भूस्खलनामुळे हे भूसुरुंग त्यांच्या मूळ ठिकाणाहून हलू शकतात. त्यामुळे गस्तीदरम्यान जवानांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात असून सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. सीमेवरील परिस्थितीवर लष्कराचे बारकाईने लक्ष असून पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…