खोकल्यासाठी मेडिकलमध्ये थेट सिरप मिळणार नाही! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारक

नवी दिल्ली : सर्दी, खोकला किंवा घसा दुखताच अनेकजण थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन कफ सिरप खरेदी करतात. मात्र आता ही सवय बदलावी लागणार आहे. केंद्र सरकारने सिरप स्वरूपातील औषधांच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला असून, यापुढे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप आणि इतर सिरप विकता येणार नाहीत.
देशातील काही राज्यांमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील घटनांनंतर औषधांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 जून रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली. नवीन नियमांनुसार, सिरप स्वरूपातील औषधांची ‘ओव्हर द काउंटर’ म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणारी विक्री बंद करण्यात आली आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता हा निर्णय अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे.
ड्रग्ज नियम 1945 अंतर्गत करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार ‘शेड्युल K’ मधील काही सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कफ सिरपसह अनेक सिरप औषधांना पूर्वीप्रमाणे थेट विक्रीची मुभा राहिलेली नाही. या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम होणार आहे. किरकोळ खोकला किंवा सर्दी झाल्यास स्वतःच्या मनाने औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईसह परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…