मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये स्त्री शक्तीचा जागर; ‘श्रीसूक्तम्’चे सामुदायिक पठण

संस्कृत भाषा ही भारतातील सर्व संप्रदाय आणि पंथांना जोडणारी प्राचीन भाषा – श्रीकांत नांदापूरकर

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शारदीय नवरात्र उत्सव हा पावन पर्व आहे. या काळात स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र होत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आई, बहीण, आत्या, मावशी, काकू, आजी या नात्यांमधून समाजातील नातेसंबंध टिकून आहेत. भारतमातेलाही आई म्हणून संबोधले जाते. मुलींनी किंवा महिलांनी कोणतेही संकट आल्यास न डगमगता त्याचा सामना करणे आवश्यक आहे. नवरात्र उत्सवानिमित्त देवीची उपासना करण्यात यावी. देवी लक्ष्मीचे श्रीसूक्तम् हे संस्कृत श्लोक असून, या श्लोकांच्या पठणाने मुलांची बुद्धी तीव्र होते, तसेच पाठांतर क्षमता आणि एकाग्रता वाढते. संस्कृत भाषा ही आपली संस्कृती आहे, ती प्रत्येकाने जोपासावी, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे जिल्हाप्रमुख श्रीकांत नांदापूरकर यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत श्रीसूक्तम् पाठाचे सामुदायिक पठण करण्यात आले. याप्रसंगी विहिंपचे मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे विभागप्रमुख गजेंद्र सोनवणे, जिल्हाप्रमुख श्रीकांत नांदापूरकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, अरुण खिची, प्राचार्य प्रा. अनुरीता झगडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य प्रा. अनुरीता झगडे म्हणाल्या, “शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून संस्कार केंद्र आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि भारतीय संस्कृतीची जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रीसूक्तम् पठणासारख्या उपक्रमांमुळे मुलींमध्ये सकारात्मक ऊर्जा, शिस्त आणि एकाग्रता वाढते. आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनी हीच उद्याची सक्षम स्त्री शक्ती आहे.” या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी तुबा खान या विद्यार्थिनीने ‘व्यंकटेश स्तोत्रा’तील संस्कृत श्लोक सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजेंद्र सोनवणे यांनी केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…