करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई स्कंदमाता सजली

राजन शेळके, (प्रतिनिधी ): आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२६, शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ च्या षष्ठीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई स्कंदमाता रूपात सजली आहेत. जगदंबेच्या नवदुर्गांपैकी देवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता. स्कंद म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेयाचा जन्म हा देवीच्या लीलांमधील एक विशेष प्रसंग आहे.

तारकासुराचा वध शिवाचा पुत्र करेल, या वरदानाला अनुसरून देवांनी शिव-पार्वतीचा विवाह व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले. प्रत्यक्षात ज्यावेळी शिव-पार्वतीच्या मिलनाची वेळ आली, तेव्हा इंद्राच्या मनात असूया आणि घाई दोन्ही निर्माण झाली. त्याला वाटले की, साक्षात शिवाचे तेज आणि पार्वतीचे बीज यातून एकत्र आकाराला येणारा पुत्र जगात सर्वश्रेष्ठ असेल. म्हणून त्याने अग्नीकरवी शिवतेज हिरावून आणले. प्रचंड दुःखी झालेल्या पार्वतीने देवांना तुम्हाला औरस संतती होणार नाही, असाही शाप दिला. शेवटी शिवाचे तेज गंगेने धारण केले. काही काळ गंगेच्या उदरात राहिल्यानंतर हे तेज कृत्तिका नक्षत्राच्या सहा देवींनी स्वतःकडे धारण केले. पण लोकापवादाच्या भीतीने त्यांनी ते तेज गंगेच्या काठावर असलेल्या शरकांडाच्या वनात टाकून दिले. त्याच ठिकाणी अवतीर्ण झाला षण्मुख अर्थात सहा मुखांचा स्कंद म्हणजेच कार्तिकेय. कृत्तिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय.

नेमक्या त्याच क्षणी आकाशातून विमानमार्गे जाताना या बाळाचा आक्रोश ऐकून पार्वतीच्या उरात पान्हा दाटला. तिने भगवान शंकरांना विनंती करून या बाळाजवळ जाण्यासाठी तयार केले. त्या पुत्राला पाहताच पार्वतीच्या मनामध्ये अपार माया दाटून आली. तिने चटकन या बाळाला छातीशी धरले. तिचे स्तन्य पिऊन हा बालक शक्तिशाली झाला. तिच्याच हातातील शक्ती आयुध घेऊन त्याने तारकासुराचा वध केला. शिवाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून तो देवांचा सेनापती झाला; पण आईसाठी मात्र तो कायमच लाडके बाळ राहिला.अशा या कुमाराला मांडीवर घेतलेले देवीचे रूप म्हणजे स्कंदमाता. मनापासून हाक मारणाऱ्या प्रत्येकाला ती आपले करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.अशी केवळ एका हाकेला धावून जाणारी स्कंदमाता आपल्या सर्वांचे असेच रक्षण करो, ही तिच्या चरणी प्रार्थना.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…