मुळा धरण परिसरातील जनजाती बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर; ६३ जणांना चष्म्यांचे वाटप

२४ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान; १० जणांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविले

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी ) :  जिल्ह्यातील अहिल्यानगर शहरासह उत्तर नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर जनजाती (आदिवासी) बांधव राहतात. या परिसरातील गरजू वयोवृद्ध महिला व पुरुषांसाठी जनजाती कल्याण आश्रम, अहिल्यानगर शाखेच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात एकूण १५२ महिला व पुरुष रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ रुग्णांना प्रत्येकी ५० रुपये या अल्प दरात चष्मे देण्यात आले. तपासणीदरम्यान २४ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळले. त्यापैकी १० रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पद्मश्री मनोहर डोळे यांच्या संस्थेच्या नारायणगाव, तालुका जुन्नर येथील नेत्र रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले. या शिबिरासाठी जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पारगावकर, प्रांत सहसचिव महेंद्र जाखेटे, प्रांत आरोग्यप्रमुख डॉ. निळकंठ ठाकरे, प्रांत छात्रावास सदस्य विशारद पेटकर, सचिव अनंत पुंड, कोषप्रमुख अनिल लवांडे, प्रशांत आढाव, नानासाहेब गुरसळ, थिगळे सर तसेच तरुण नेतृत्व प्रसाद आढाव उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वितेसाठी जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हा संघटनमंत्री हरिजीत माळी, जिल्हा हितरक्षा प्रमुख संदीप गायकवाड आणि अंशकालीन कार्यकर्ते रमेशजी यांनी परिश्रम घेतले. कीर्ती ऑप्टिकलचे विनोद दोषी यांनी स्वतः उपस्थित राहून गरजू रुग्णांना चष्म्यांचे वाटप केले. जनजाती कल्याण आश्रम, अहिल्यानगर शाखेच्या माध्यमातून गरजू जनजाती बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच समाजबांधवांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्य केले जाते. दानशूर व सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी आश्रमाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव अनंत पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राज्य में सूखे का संकट, किसानों को ₹5,000 की अग्रिम मदद; CM फडणवीस ने दिया भरोसा

महाराष्ट्र में सूखे की मार झेल रहे किसानों के लिए राज्य सरकार ने मदद का भरोसा दिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया है कि संकट की इस घड़ी…

महाराष्ट्र-गोवा सीमा चेकपोस्ट पर ACB की छापेमारी, ₹13,070 की नकदी जब्त

बांदा : महाराष्ट्र-गोवा सीमा पर स्थित आबकारी विभाग के चेकपोस्ट एक बार फिर चर्चा में हैं। भ्रष्टाचार की शिकायतों और चेकपोस्ट पर कथित तौर पर पैसे लेने के आरोपों के…