मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 15 मे पासून तुमच्या नळाला पाणी कमी येणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहर तसेच उपनगरात १० टक्के पाणी कपात जाहीर केली आहे. वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वेग आणि आगामी मान्सूनबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवार १५ मे २०२६ पासून मुंबईसह उपनगरात ही पाणी कपात लागू होणार आहे. जोपर्यंत पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत नाही, तोपर्यंत ही कपात कायम राहणार आहे.महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये सध्या केवळ ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक गरजेच्या तुलनेत हा साठा केवळ २३.५२ टक्के इतकाच शिल्लक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून यामुळे बाष्पीभवन होत आहे. तसेच अल निनोच्या प्रभावामुळे आगामी मान्सूनबाबत अनिश्चितता पाहायला मिळत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार ही कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी या कपातीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांच्या राखीव साठ्यातून मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. मात्र, भविष्यात उद्भवू शकणारी टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. ही कपात केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे आणि भिवंडी-निजामपूर यांसारख्या ज्या भागांना मुंबईतून पाणीपुरवठा होतो, तिथेही लागू असेल.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…